मुंबईतील गोरेगावात इमारतीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

Mumbai News : मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ इमारतीमध्ये आग लागली आणि एकच गोंधळ माजला. आगीचं स्वरुप पाहता परिसरातही भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.   

सायली पाटील | Updated: Oct 6, 2023, 11:26 AM IST
मुंबईतील गोरेगावात इमारतीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू  title=
Mumbai News Goregaon west fire in building parking many injured possible casulties latest update

Mumbai News : गुरुवारी रात्री मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीतील पार्किंगला भीषण आग लागली. या दुर्घटनेतून 30 जणांना वाचवण्यात यश आलं असून 14 जण जखमी झाले. आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याती माहिती समोर आली. आगीचं स्वरुप इतकं होतं की सुमारे 30 हून अधिक बाईक आणि 4 कार त्यात जळून खाक झाल्या आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ज्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या इथं कुलिंगचं काम सुरू असून, आग कशी लागली याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तपास घेत आहे.  

इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून तिथं असणाऱ्या जुन्या कपड्यांनी ती आणखी धुमसत गेली. आणि काही वेळातच संपूर्ण पार्किंग लॉटसह पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत ही आग पोहोचली.