Mumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री

Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.   

Updated: Jan 22, 2023, 07:30 AM IST
Mumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री title=
Mumbai news electricity bill charges may increase in mumbai Mahavitaran Adani and Tata also petition for power tariff hike marathi news

Mumbai Light Bill : येत्या 1 फेब्रुवारी 2023 देशाचं बजेट मांडलं जाणार आहे. त्याआधी मुंबईतील कॉमन मॅनचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण वीजबिलासाठी त्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.  सध्याचा सरासरी वीज पुरवठय़ाचा दर (कॉस्ट ऑफ सप्लाय) 7.27 रुपये प्रति युनिट आहे. हे दर अजून वाढविण्यासाठी महावितरण पाठोपाठ अदानी आणि टाटा यांनीही वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. 

वीजबिलासाठी जास्त पैसे मोजावे लागणार?

मुंबईकरांच्या वीज बिलात थोडी थोडकी नव्हे तर 50 रुपयांची वाढ होणार आहे. 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी वीज दरात एक टक्का वाढ प्रस्तावित केलीये. या याचिकेवर पुढल्या महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होईल आणि एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दराप्रमाणे वीजबिल मिळणार आहे.(Mumbai news electricity bill charges may increase in mumbai Mahavitaran Adani and Tata also petition for power tariff hike marathi news)

कोळशाच्या किमती वाढल्याने वीजदरात वाढ होण्याची शक्यता

2023-24 मध्ये इंधन समायोजन शुल्क (FAC) ओझे आणि गेल्या वर्षीपासून वाढत्या कोळशाच्या किमतीमुळे वीजदर वाढ होण्याची शक्यता आहे.