Crime News : गप्पा मारत असतानाच आरोपीने चॉपर काढला अन्.... पूर्ववैमन्यासातून तरुणावर हल्ला

Crime News : या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. पूर्ववैमन्यासातून हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.

Updated: Jan 21, 2023, 04:50 PM IST
Crime News : गप्पा मारत असतानाच आरोपीने चॉपर काढला अन्.... पूर्ववैमन्यासातून तरुणावर हल्ला title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : पूर्ववैमन्यासातून एका 22 वर्षीय तरुणावर चॉपेरने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना भिवंडीत (Bhivandi Crime News) घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बिलाल शेख असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. बिलाल हा आपल्या मित्रासोबत भिवंडी कोशिंबी गावातील हद्दीत असलेल्या सागर इन हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवणानंतर तो काउंटरवर बिल भरण्यासाठी मित्रासह गेला. त्यावेळी गप्पा मारत असताना बिलालच्या शेजारीच जेवणासाठी बसलेले दोन तरुण त्याच्याजवळ आले. यातील एक तरुणाने बिलालवर चॉपरने वार केला. 

हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव भावेश बेळवले असल्याचे समोर आले आहे. बिलाल बिल भरत असताना भावेश त्याच्या मागे आला आणि त्याने कमरेखाली चॉपरने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने भावेश खाली कोसळला आणि त्याने हॉटेलमधून बाहेर पळ काढला. त्यानंतर हॉटेलच्या पॅसेजमधील ग्रीलवरून उडी मारताना बिलाल खाली कोसळला. चालता येत नसतानाही बिलाल लंगडत पळ काढ  ण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आरोपी भावेशने त्याचा पाठलाग सुरु केला.

पॅसेजमधून खाली उतरताच भावेशने पुन्हा बिलालच्या मानेवर, पोटात सपासप वार करायला सुरुवात केली. त्याच वेळेस बिलालचा मित्र सर्फराज गुलाबर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भावेशने त्यालाही धमकावले. यानंतर सर्फराजने मित्राला वाचवण्यासाठी त्याची चारचाकी गाडी भावेशच्या अंगावर टाकली. यानंतर भावेशने तिथून पळ काढला. त्यानंतर सर्फराजने बिलालला गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये भरती केलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. या प्रकरणी भावेश बेलवळे याच्यावर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.