Mumbai News : 'जय श्रीराम बोला, तरच...' कॅब चालकाची दादागिरी; डॉक्टरने शेअर केला अनुभव

मुंबईत दर दिवशी अनेकांची ये-जा होते. विविध माध्यमांचा वापर करत प्रत्येक जण आपल्या परिनं या शहरात प्रवास करताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा असा, की हा प्रवास किंवा या प्रवासाचा अनुभव प्रत्येकासाठीच चांगला असतो असं नाही. शहरात नुकतीच घडलेली घटना हेच सुचवते आहे. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला जिथं, एका वरिष्ठ डॉक्टरांना कॅब चालकाच्या विचित्र वागण्याला सामोरं जावं लागलं. 

सायली पाटील | Updated: Feb 14, 2024, 12:36 PM IST
Mumbai News : 'जय श्रीराम बोला, तरच...' कॅब चालकाची दादागिरी; डॉक्टरने शेअर केला अनुभव title=
(प्रतिकात्मक छायाचित्र)/ Mumbai News Doctor Asked To Chant Jai Shri Ram By Cab Driver To Confirm Booking

Mumbai News : मुंबईत दर दिवशी अनेकांची ये-जा होते. विविध माध्यमांचा वापर करत प्रत्येक जण आपल्या परिनं या शहरात प्रवास करताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा असा, की हा प्रवास किंवा या प्रवासाचा अनुभव प्रत्येकासाठीच चांगला असतो असं नाही. शहरात नुकतीच घडलेली घटना हेच सुचवते आहे. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला जिथं, एका वरिष्ठ डॉक्टरांना कॅब चालकाच्या विचित्र वागण्याला सामोरं जावं लागलं. 

'जय श्रीराम बोला तरच कॅब कन्फर्म करेन', अशी अजब मागणी कॅब चालकानं प्रवासी डॉक्टरांपुढं ठेवली. डॉ. एके पठाण असं अॅपच्या माध्यमातून कॅब बुक करणाऱ्या डॉक्टरांचं नाव असून, त्यांनी मुंबई ते नाशिक अशा मोठ्या पल्ल्यासाठी कॅब बुक केली होती. एका लग्नसोहळ्यासाठी म्हणून ते निघेल होते. याच कॅबनं प्रवास करण्याआधीच त्यांना हादरवणारा अनुभव आला, जिथं कॅब चालकानं त्यांना राईड कन्फर्म करण्यासाठी जय श्रीराम म्हणण्याची सक्तीच केली. InDrive mobile app च्या माध्यमातून आलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये हा मेसेज डॉक्टरांना आला आणि त्यांच्या भुवयाच उंचावल्या. 

....आणि मेसेज आला 

InDrive च्या माध्यामतून डॉ. पठाण यांनी एक कॅब बुक केली आणि त्यांना चालकानं कन्फर्मेशनसाठी एक मेसेज पाठवला. पठाण यांच्या माहितीनुसार त्यांनी चालकाला मुंबईतील हाजीअली येथून दुपारच्या सुमारास आपल्याला Pick up करण्यासाठी येण्यास सांगितलं. ज्यावर आपण रामभक्त असून, 'तुम्ही जय श्रीराम म्हणालात, तरच या राईडसाठी मी तयार होईन' अशी मागणी चालकानं केली. आपल्याला जय श्रीराम म्हणण्यात कोणतीही अडचण नाही, पण अशा कोणत्याही प्रसंगी यासाठी अशी बळजबरी नको असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.  

हेसुद्धा वाचा : तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी 

चालकानं ही मागणी करताय डॉक्टरांनी काय केलं? 

आपल्यासोबत घडलेल्या या प्रकाराची माहिती देताना डॉक्टर पठाण यांनी आपण चालकाच्या मागणीवर काहीही उत्तर न देता हा प्रकारच टाळण्याचा प्रयत्न करत ती राईडच न घेण्याचा निर्णय घेतला. आपण सर्वांनी विविध समाजांबाबत स्वीकारार्हता आणि समजुतदारपणा दाखवण्याची गरज असल्याचा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. 

'श्री राम भक्त सनातनी हूँ. जय श्रीराम बोलना पडेगा... तो कन्फर्म करु' असं त्या कॅब चालकाचं मेसेजमधील वाक्य होतं. दरम्यान, ज्यावेळी प्रवाशाकडून राईड न घेता या प्रकरणाची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा चालकानं चलाखी दाखवत राईड रद्द केली. एका प्रतिष्ठीत वृत्तपत्राच्या माहितीनुसार अद्यापही या कॅब सुविधा पुरवणाऱ्या संस्थेकडून घडल्या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.