Madh Versova Bridge: मुंबईतील वाहतुककोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तोडगा काढला आहे. मुंबईत मेट्रो आणि उड्डाणपुलाचे जाळे विणण्यात येत आहे. मुंबई महानगर पालिका मढ ते वर्सोवा दरम्यान एक केबल पुल बांधणार आहे. या पुलामुळं दीड तासांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत येणार आहे. या पुलामुळं वाहतुक कोंडीदेखील कमी होणार आहे. बीएमसीने रविवारी या पुलासाठी 1,800 कोटी रुपयाचे टेंडर जारी करण्यात आले आहे.
मढ-वर्सोवा पुलाचा प्रस्ताव 2015मध्येच मंजुर करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या आराखड्याला बीएमसीने 2020मध्ये मंजुर केले. त्याचबरोबर, खार सबवे आणि वांद्रे टर्मिनस कनेक्टर पूर्व-पश्चिम जोडणीसाठी उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. मढ-वर्सोवादरम्यान केबल पूल उभारण्याची खास सबवेजवळ उन्नत रस्ता उभारण्यात येणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे पालिकाकडून सांगण्यात येत आहे.
मढ-वर्सोवा दरम्यान अनेक गावे आहेत. त्यांना प्रवासासाठी बोटींचा वापर करावा लागतो. नागरिकांनी वर्सोवा ते मढ दरम्यान पूल बांधण्याची मागणी केली होती. महापालिकेने या मागणीचा गांभीर्याने विचार करत या पुलासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. योग्य कंत्राटदारालाच या पुलाचे कंत्राट देण्यात येणार आहे.
पालिकाला खाडीवर पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने फेब्रुवारी 2023 मध्ये यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता पुलाचा आराखडा आणि बांधकामासाठी निविदा काढली आहे. पुलाच्या उभारणीसाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.
मालाड येथून मढ, वर्सोवादरम्यान 21 ते 22 किमी प्रवाससाठी दीड तासांचा वेळ लागतो. पण ट्रॅफिक लागल्यास जास्त वेळ लागतो. वर्सोवा-मढदरम्यान फेरी बोट प्रवासाची सुविधा आहे. या फेरी प्रवासात दुचाकी वाहने आणि प्रवाशांचीही वाहतूक होते. मात्र पावसाळ्यात या फेरी बोट बंद असतात. तर ओहोटीच्या वेळीही त्या बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळं पालिकेने मढ-वर्सोवा खाडीवर पुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.