Mumbai News : दक्षिण मुंबईतील 'हा' ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी 18 महिने बंद; वाहतूक कोंडी आणखी वाढणार

Mumbai News : मुंबईतील वाहतुकीवर होणार परिणाम.... 18 महिन्यांपपर्यंत काय आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी.   

सायली पाटील | Updated: Jun 24, 2024, 10:06 AM IST
Mumbai News : दक्षिण मुंबईतील 'हा' ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी 18 महिने बंद; वाहतूक कोंडी आणखी वाढणार title=
Mumbai news Bellasis Bridge vehicle movment closed for 18 months latest news

Mumbai News : मुंबई शहरात असणाऱ्या उड्डाणपुलांनी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत भरीव योगदान दिलं असून, या उड्डाणपुलांमुळं बऱ्याचदा वाहतूक कोंडीला बगल देणं सहज शक्य होतं. याशिवाय शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात अगदी सहजगत्या पोहोचता येतं. अशा या उड्डाणपुलांपैकी जुनं बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवे उड्डाण पूल उभारण्याचं काम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनानं हाती घेतलं आहे. 

पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या याच उपक्रमाअंतर्गत दक्षिण मुंबईतील अतिशय महत्त्वाचा असा ब्रिटीशकालीन पूलही नव्यानं बांधला जाणार आहे. यासाठी पुलावरील वाहतूक 18 महिने बंद ठेवण्यात येणार असून, यादरम्यान त्याचं पाडकाम प्रशासन हाती घेणार आहे. पाडकामासमवेत या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामालाही वेग येईल. यादरम्यान इथून ये-जा करणारी वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात येईल. 

वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार रेल्वेच्या निर्णयानंतर अखेर मुंबई वाहतूक पोलिसांकडून मुंबईतील सुमारे 130 वर्षे जुन्या बेलासिस पुलावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल अशा महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या या पुलावरील वाहतूक बंद असतेवेळे वाहनधारकांना मुंबई सेंट्रल जंक्शन ते ताडदेव जंक्शन मार्गे वाहतूक करण्याचा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Video : पवना धरणात तरुण बुडाला; तर, बदलापूरातील कोंडेश्वर येथे तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी 

दरम्यानच्या काळात पठ्ठे बापूराव मार्गावर ताडदेव सर्कल ते नवजीवन जंक्शनपर्यंत नो पार्किंग असेल याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, पर्यायी मार्गांवर काही ठराविक वेळांमध्ये वाहतूक कोंडी नाकारता येत नाही, ज्यामुळं या नव्या मार्गांचा विचार करूनच मुंबईकरांनी दिवसभराच्या प्रवासाची आखणी करावी. 

जवळपास 1893 मध्ये वाहतुकीसाठी सुरु करण्यात आलेल्या बेलासिस पुलानं बांधकामानंतरचं त्याचं आयुर्मान ओलांडलं असून, आता त्या पुलाच्या डागडुजी अथवा पुनर्बांधणीची गरज असल्याची बबा प्रकर्षानं समोर आली. त्यातच अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर शहरातील पुलांच्या सुस्थितीसंदर्भात अनेक प्रश्न ऐरणीवर आले आणि त्यातूनच आता ब्रिटीशकालिन पुलांच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासन सातत्यानं प्रयत्न करताना दिसू लागलं आहे.