Mumbai News : एसी डबलडेकरनंतर आता मुंबईकरांना बेस्टच्या वॉटर टॅक्सीतूनही प्रवास

BEST Water Taxi : एसी डबलडेकरनंतर ( Mumbai AC Double Decker ) लवकरच आता मुंबईकरांना (Mumbai) बेस्टच्या वॉटर टॅक्सीतूनही प्रवास करता येणार आहे. (BEST Water Taxi ) जमीन आणि पाणी या दोन्हीकडे धावणाऱ्या वॉटर टॅक्सीच्या पर्यायाची बेस्टकडून चाचपणी सुरु आहे.  

Updated: Feb 24, 2023, 07:49 AM IST
Mumbai News : एसी डबलडेकरनंतर आता मुंबईकरांना बेस्टच्या वॉटर टॅक्सीतूनही प्रवास title=
संग्रहित छाया

Mumbai Best News : एसी डबलडेकरनंतर ( Mumbai AC Double Decker ) लवकरच आता मुंबईकरांना (Mumbai) बेस्टच्या वॉटर टॅक्सीतूनही प्रवास करता येणार आहे. (BEST Water Taxi ) जमीन आणि पाणी या दोन्हीकडे धावणाऱ्या वॉटर टॅक्सीच्या पर्यायाची बेस्टकडून चाचपणी सुरु आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या सहकार्यानं ही चाचपणी होणार आहे. त्याचा अहवाल बेस्टला मार्चपर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतर बेस्टकडून यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. तर जूनपर्यंत बेस्टकडून अ‍ॅपवर आधारीत 500 एसी टॅक्सीही दाखल करण्याचे उद्दीष्ट आहे. (Mumbai News )

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून या पर्याय पुढे आला आहे. यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या सहकार्याने अभ्यास करण्यात येत आहे. जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणाहून बेस्टची ही नवी वॉटर टॅक्सी सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी याबाबत घोषणा केली होती. मुंबईत वाढते प्रदूषण लक्षात घेता जमीन आणि पाण्यामधून टॅक्सी सुरु करण्याची संकल्पना पुढे आली आहे. अशी सेवा सुरु झाली तर इंधन बचत आणि प्रदूषण कमी होईल. तसेच प्रवाशांना एक नवा पर्यायही उपलब्ध होईल, अशी या मागाचा हेतू आहे.

ही सेवा सुरु करण्याची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी बेस्टप्रमाणे मोबाईल (BEST Water Taxi) अॅपआधारित ही सेवा आरक्षित करण्याचा विचार आहे. परदेशात जमीन आणि पाण्यावर चालणाऱ्या बससेवाआहेत. त्याचधर्तीवर अशा सेवा सुरु करण्याचा विचार आहे.

मुंबई ते नवी मुंबई (बेलापूर) आणि मुंबई ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी (Water Taxi) सुरु करण्यात आली आहे. मात्र, प्रवासी संख्या मिळत नसल्याने मुंबई ते नवी मुंबई वॉटर ट्रक्सी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा वॉटर टॅक्सी सुरु झाली आहे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 40 ते 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे.

जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली होती. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटा दरम्यान ही सेवा सुरु आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरु आहे. परंतु मुंबई ते बेलापूर सेवेला अल्पप्रतिसाद मिळाला.