मुंबईतील दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू मात्र कसे असतील बाकीचे नियम वाचा

मुंबईतील लॉकडाऊनचे नियम शिथिल, दुकानं सुरू रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळांसाठी कसे असतील नियम? वाचा सविस्तर

Updated: Aug 2, 2021, 09:45 PM IST
मुंबईतील दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू मात्र कसे असतील बाकीचे नियम वाचा title=

मुंबई: राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार आता रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली असली तरी मुंबई-ठाणे आणि उपनगरातील नियम वेगळे असणार आहेत. मुंबईतील दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. सगळे दिवस दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. 

मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल्स सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय इनडोर आणि आऊटडोर खेळासाठी आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी देण्यात आली आहे. 

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क सर्व ठिकाणी अनिवार्य असणार आहे. याशिवाय नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

मुंबईत निर्बंध शिथिलतेसाठी महापालिकेच्या गाईडलाईन्स जारी -आठवड्याचे सर्व दिवस दुकाने व आस्थापना १० वाजेपर्यंत खुली राहणार -हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्याचे सर्व दिवस ४ वाजेपर्यंत चालु राहतील. -यापूर्वी विकेंड लॉकडाऊन हॉटेल्स रेस्टॉरंटना लागू होता मात्र तो आता असणार नाही. दुपारी 4 पर्यंत हॉटेल्स सुरू ठेवायला परवानगी -जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून इनडोअर आऊटडोअर क्रीडाप्रकार नियमीत वेळेनुसार सुरु राहतील - मालिका,चित्रपटांच्या चित्रीकरणाला परवानगी - वरील नियम उद्यापासून लागू होतील

धार्मिक स्थळं बंदच

राज्यातील सर्व धार्मिक क्षेत्र ही बंदच राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भक्त गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असते. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

लोकलबाबत निर्णय काय?

राज्यात सर्वसामांन्यासाठी लोकल बंदच आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीत लोकल रेल्वेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वांसाठी लोकल सुरु करण्याबबातचा निर्णय हा प्रशासनाशी बोलून घेण्यात येणार आहे.