मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण

Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा...   

सायली पाटील | Updated: Feb 12, 2024, 10:23 AM IST
मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण  title=
(छाया सौजन्य- मुंबई मेट्रो)/ Mumbai Navi Mumbai to connect on a single metro line latest updates

Mumbai News : सुरुवातीला ज्या मुंबईची लाईफलाईन Mumbai Local ओळखली जात होती त्याच मुंबईत आता लोकल प्रवासालाही अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. शहरासह उपनगरीय भागांमधूनही आता मेट्रो आणि मोनो रेल्वेची सेवा सुरु झाल्यामुळं नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर झाला आहे. अशा या मुंबई शहरापासून आता फक्त नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरच नव्हे तर थेट अलिबागही अतिप्रचंड वेगानं गाठता येणार आहे. ज्यासाठी सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विरार-अलिबाग या मार्गावर नायगाव ते अलिबाग अशा साधारण 136 किमीच्या मेट्रो मार्गिकेसाठीचा निरीक्षणपर अभ्यास सुरु केला आहे. 

हेसुद्धा वाचा : 'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा 

कसे असतील या प्रवासाचे टप्पे? 

पुढील सहा महिने या मेट्रो मार्गिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे ठरणार असून, प्राथमिक स्तरावरील माहितीनुसार या दरम्यान 40 स्थानकं असतील. शिवाय या मेट्रो मार्गाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि JNPA जोडण्यात येईल. एमएसआरडीसीकडून हा बहुप्रतीक्षित प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यासाठीची भूसंपादन निविदा प्रक्रियाही आता अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

वसईतील नायगाव ते अलिबागपर्यंतच्या या मेट्रोच्या स्थानकांमध्ये भविष्यात आणखी वाढ होणार असून, ही देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याची मेट्रो ठरेल. या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचा फायदा मुंबई, विरार पट्ट्यासह भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या भागांनाही होणार आहे. 

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो 3 

अटल सेतू, कोस्टल रोड आणि आता त्यामागोमाग मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 3 ही सेरावही रुजू होणार आहे. त्यामुळं शहरात ये- जा करणाऱ्यांचा प्रवास आणखी सुखकर आणि आरामदायी होणार यात शंका नाही. उपलब्ध माहितीनुसार ही शहरातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो असून तिला अॅक्वा मेट्रो असंही म्हटलं जात आहे. या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील आरेपासून बीकेसीपर्यंतच्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून, बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील काम आता अखेरच्या टप्प्यात असेल असं सांगण्यात येत आहे.