मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर रविवारी (17 जुलै) ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 या वेळेत सर्व फास्ट लोकल या स्लो लाईनवरून धावतील. यामुळे लोकल वाहतून 10 मिनिटं विलंबानं होण्याची शक्यता आहे. (mumbai mega block update sunday 17 july mega block on central and harbour line)
तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-कुर्ला आणि वांद्रे हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात कुर्ला ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. मेगाब्लाॉक असल्याने गाड्या 10 मिनिटं उशिरा पोहचण्याची शक्यता आहे.
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13. पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.