Mumbai Mega Block : आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

Mega Block On Sunday :  आज रविवार (Mumbai News) त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि लोकलने कुठे जाणार आहे. तर आधी मेगाब्लॉकमुळे तुमची गैरसाय होऊन नये, म्हणून आधी ही बातमी वाचा. 

Updated: Mar 12, 2023, 08:51 AM IST
Mumbai Mega Block : आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी  title=
Mumbai Mega Block central railway local Train Schedule timetable Sunday 12 March 2023 in marathi

Mumbai Mega Block Train Schedule Sunday 12 March 2023 in marathi : मुंबईची जीवनहानीवर (Local train) दर रविवारी मेगाब्लॉक (Mega Block News) घेण्यात येतो. मुंबईकर एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मुंबईकरांसाच्या (mumbai local mega block today) सुरक्षेच्या दृष्टीने दर रविवारी लोकल ट्रेन धावणाऱ्या रेल्वे टॅकची दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येतं. पण या मेगाब्लॉकमुळे सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत बाहेर पडण्याचा विचार मुंबईकर करतो आणि नाहक मेगाब्लॉकच्या जाळ्यात अकडतो. (Central Railway) मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचं वेळापत्रक नक्की पाहा...(mega block news today)

मध्य रेल्वे मेगाब्लॉकचं वेळापत्रक (Central Railway Megablock Schedule)

स्थानक : माटुंगा ते मुलुंड

मार्ग : अप आणि डाऊन जलद

वेळ : सकाळी 11.05 ते दुपारी 3.55

परिणाम : मेगाब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द होणार असून, उर्वरित फेऱ्या 15 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. 

हार्बर रेल्वे (timetable harbour line)

स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40

परिणाम : यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड स्टेशनवरून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. त्याशिवाय सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव लोकल फेऱ्याही रद्द असणार आहेत. पनवेल आणि कुर्लादरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

MegaBlock_Update

मुंबई आणि हुबळीदरम्यान विशेष रेल्वेगाडी (Special trains between Mumbai and Hubli)

उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबई आणि हुबळीदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सोमवारी 13 मार्चला 07318 विशेष गाडी दादर स्टेशून दुपारी 1.05 सुटेल.