मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात

मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात बिकेसी येथे घडला. या घटनेत महापौर सुरक्षित आहेत. मात्र, दुचाकीस्वाराने महापौरांच्या गाडी चालकास मारहाण केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 23, 2018, 10:30 PM IST
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात title=

मुंबई : मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात बिकेसी येथे घडला. या घटनेत महापौर सुरक्षित आहेत. मात्र, दुचाकीस्वाराने महापौरांच्या गाडी चालकास मारहाण केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका अज्ञात दुचाकीस्वाराने महाडेश्वर यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर महाडेश्वर यांच्या चालकाने गाडी रस्त्याकडेला  घेतली. दरम्यान, दुचाकीस्वार आणि महाडेश्वर यांचा गाडीचालक यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. यातून संतापलेल्या दुचाकी स्वाराने महाडेश्वर यांच्या चालकाला मारहाण करण्याच प्रयत्न केला. यात दुचाकीस्वाराने चालकाच्या डोक्यात हेल्मेट घालण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, खेतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पूढील तपास करत आहेत.