Mumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?

Mumbai Real Estate : मुंबईत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; साध्यासुध्या मुंबईकरांच्या 300 स्क्वेअर फीटपेक्षा हे घर 100 पटींनी मोठं, पाहा त्याचं Exact Location 

Updated: Feb 10, 2023, 08:59 AM IST
Mumbai Housing : वरळीत देशातील सर्वात महागड्या घराची विक्री; 240 कोटी रुपयांना एक घर खरेदी करणारा व्यावसायिक आहे तरी कोण?  title=
Mumbai Man Buys Penthouse in Worli Worth 240 crore in Indias Costliest Apartment deals

Mumbai Real Estate : (Mumbai house rates) मुंबईत घर असावं अशी शंभरातल्या किमान 60 टक्के नोकरदार वर्गाची अपेक्षा असते. काहींचं हे स्वप्न साकार होतं, तर काहींना मात्र एकतर या स्वप्नाला सत्याता उतरवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते किंवा हे स्वप्नच विसरावं लागतं (dream home). कारण, मुंबईत गगनाला भिडणारे घरांचे दर. आर्थिक गणित कोलमडून टाकणारी ही गणितं सर्वांना जमतात असं नाही. याच मुंबईत सध्या अशा एका घराचा व्यवहारा झाला आहे, ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा सुरुये. इतकंच नव्हे, तर हे भारतातील आतापर्यंतचं सर्वात महागडं, विक्री झालेलं घर ठरत आहे. 

वरळीत घराचे दर गगनाला भिडले? 

मुंबईतील मोक्याचं ठिकाण असणाऱ्या (Worli) वरळीमध्ये नुकतंच एका व्यावसायिकानं तब्बल 240 कोटी रुपये इतकी किंमत असणारं (Penthouse) पेंटहाऊस खरेदी केलं आहे. बी.के. गोएंका असं या व्यावसायिकाचं नाव असून, ते Welspun Group चे अध्यक्ष आहेत. 

वरळीत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठ्या बिल्डरचे प्रोजेक्ट आले आणि येथील वस्त्यांचा कायापालट झाला. अशाच एका नावाजलेल्या प्रोजेक्टमध्ये गोएंका यांनी हे घर खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. वरळीतील Three Sixty West या अॅनी बेझंट मार्गावरील प्रोजेक्टमध्ये त्यांनी घर खरेदी केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे घर 'थ्रीप्लेक्स' असून ते 63, 64 आणि 65 व्या मजल्यांवर पसरलं आहे. टॉवर B मध्ये असणाऱ्या या घराचं क्षेत्रफळ तब्बल 30,000 चौरस फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

सर्वसामान्यांच्या घरांच्या 100 पटींनी मोठं घर... 

गोएंका यांनी खरेदी केलेल्या या घराचं क्षेत्रफळ पाहता (Mumbai redevelopment projects) मुंबईमध्ये पुनर्वसनाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या किमान 300 चौरस फुटांच्या घरापेक्षा हे घर तब्बल 100 पटींनी मोठं आहे. ज्या व्यक्तीनं हे घर खरेदी केलं आहे ते इथं वास्तव्यास येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पुढच्या दोन महिन्यांमध्ये घरांचे असेच डोळे विस्फारणारे व्यवहार पाहायला मिळतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

हेसुद्धा वाचा : MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं

दरम्यान, याच प्रोजेक्टमधील दुसऱ्या विंगमध्ये असणारं पेंटहाऊस खुद्द बिल्डर विकास ओबेरॉय यानं खरेदी केलं असून, त्याचीही किंमक 240 कोटी रुपयेच आहे. ओबेरॉय यांचंच हे प्रोजेक्ट असून, यामध्ये व्यावसायिक/ बिल्डर सुधाकर शेट्टी यांचीही भागिदारी आहे. ओबेरॉय यांच्याकडून हे घर त्यांच्या R S Estates Pvt Ltd या कंपनीच्या नावे खरेदी करण्यात आलं आहे.