मुंबई लोकल पाहा कधी होणार सुरु, सरकारने दिले हे स्पष्टीकरण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली.  त्यानंतर मुंबई लोकलची (Mumbai Local) सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली.  

Updated: Jun 14, 2021, 07:00 PM IST
मुंबई लोकल पाहा कधी होणार सुरु, सरकारने दिले हे स्पष्टीकरण title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने 'ब्रेक द चेन'अंतर्गत पुन्हा निर्बंध लागू केले. त्यानंतर मुंबई लोकलची (Mumbai Local) सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली. अद्याप लोकल प्रवासाची अनुमती देण्यात आलेली नाही. मुंबई लोकल (Mumbai Local Train) सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. मुंबई लोकलमधून सर्वसामान्य नागरिकांना अद्याप प्रवास करता येणार नाही. (Mumbai Local when it will start?)

राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत आहे. हे अनलॉक पाच लेव्हलमध्ये करण्यात येत आहे. त्यानुसार काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, असे असताना मुंबई लोकलचा प्रवास अद्याप सर्वांसाठी खुला करण्यात आलेला नाही. कोरोनाच्या पहिली लाट कमी झाल्यानंतर आणि कोरोना आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरु झाल्यानंतर पुन्हा लोकल प्रवास बंदी करण्यात आला आहे.

मुंबई लोकल कधी सुरु होणार, याबाबत आज राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जोपर्यंत मुंबई लेव्हल 1वर आल्याशिवाय सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार नाही, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुंबई सध्या लेव्हल 3वर आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये जास्त काळजी घेतली जात असल्याचेही ते म्हणालेत. त्यामुळे लोकल सुरु होण्यात किमान अजून एक महिना तरी लागू शकतो, असेच संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.