Video : 'अंकल किसको बोला...'; लोकल ट्रेनच्या दारात बसलेल्या प्रवाशाचा स्वॅग पाहिलात का?

Mumbai Local : मुंबई लोकलमधील रोज भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण चर्चगेट विरार लोकलमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला दोन प्रवाशांची बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 18, 2023, 02:09 PM IST
Video : 'अंकल किसको बोला...'; लोकल ट्रेनच्या दारात बसलेल्या प्रवाशाचा स्वॅग पाहिलात का? title=

Mumbai Local : मुंबईकरांची (Mumbai News) लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये (Local Train) रोज काही ना काही विचित्र घटना घडताना पाहायला मिळत असतात. ट्रेनमध्ये चढण्यापासून ते सीटवर बसण्यापर्यंत मुंबईकर लोकलमधल्या जागेसाठी भांडताना पाहायला मिळत असतो. यामध्ये काही प्रवासी असेही असतात जे या सगळ्या गोंधळात तुमचं मनोरंजन देखील करुन जातात. असाच काहीसा प्रकार चर्चगेट विरार लोकलमध्ये पाहायला मिळाला आहे.

मुंबई लोकलमधील रेल्वे प्रवासादरम्यान अशा अनेक घटना घडत असतात. बर्‍याच वेळा गांभीर्याने सुरू झालेला वाद शेवटी हास्यात बदलतो. तुम्ही अशा घटनांचे अनेक व्हिडिओदेखील पाहिले असतील. अशाच एका घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, मुंबई लोकल ट्रेनमधून जाणारा एक मुलगा दरवाज्याजवळ बसलेल्या एका व्यक्तीला वारंवार "काका... उठा" म्हणत आहे. अखेर, त्या व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

चर्चगेट विरार लोकलमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत आहे. ट्रेनमध्ये कोणी दारात उभे आहे तर कोणी खाली बसलं आहे. ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे की पाय ठेवायलाही जागा नाही. पण यावेळीच हा सगळा प्रकार घडला. बोरीवली स्टेशनजवळ आल्यावर ज्यांना उतरायचे आहे ते सगळे दारात येतात. पण दारात एक माणूस बसलेला असतो. ज्यांना खाली उतरायचे होते त्यापैकी एकजण म्हणाला, "काका. स्टेशन येत आहे... उठा." काका हा शब्द ऐकताच ती व्यक्ती रागाने तिथेच खाली बसली. वारंवार विनंती करुनही त्या व्यक्तीने कोणतीच प्रतिक्रिया न देता तिथेच ठाण मांडले.

त्यावेळी पुन्हा तो तरुण त्या व्यक्तीला म्हणाला, "काका, तुम्हालाच सांगत आहे इथून उठा." त्यावर खाली बसलेली व्यक्ती म्हणते, "तू कोणाशी बोलत आहेस हेच मला समजत नाही." यावर मुलगा म्हणतो,"खाली कोण बसलं आहे?" तेव्हा खाली बसलेली व्यक्ती म्हणते, "मग काका कोण आहे?". या प्रत्युत्तरानंतर ट्रेनमध्ये काही काळासाठी शांतता पसरते आणि उभ्या असलेल्या मुलाला त्याचं उत्तर मिळतं.

धावत्या लोकलमधल्या दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर सोशल यूजर्सदेखील मजेशीर कमेंट करत आहेत. "हो, तुम्ही एखाद्याला असं बोलवलं तर. कोणी रागावणार नाही का?" असं एका युजरने म्हटलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 79 हजारांहून अधिक व्ह्यूव मिळाले आहेत.