हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायब

Sheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला महत्त्वाचा पुरावच गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याबाबत मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात याबाबतची माहिती दिली.

राजीव कासले | Updated: Jun 14, 2024, 06:53 PM IST
हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायब title=

Sheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडातील एक महत्त्वाचा पुरावा गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याप्रकरणाची माहिती मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात (CBI Court) दिली आहे. पोलिसांनी जो सांगाडा शीना बोराचा (Sheena Bora) म्हणून जप्त केला होता, तो सांगडा आणि हाडं गायब झाली आहेत. 2012 मध्ये पोलिसांनी हा सांगाडा (Skeleton) पुरावा म्हणून जप्त केला होता. 2012 मध्येच शीना बोराची हत्या करण्यात आली होती. सरकारी वकिल सी जे नंदोडे यांनी याबाबत विशेष सीबीआय कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला सांगडा शोधूनही सापडला नाही अशी माहिती दिली.

जे जे रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉक्टर जेबा खान यांच्या जबाबानंतर शीना बोराच्या सांगाड्याची माहिती समोर आली होती. डॉ. जेबा खान यांनी 2012 मध्ये फॉरेन्सिक लॅबमध्ये हाडांचा तपास केल्यानंतर ही माणसाचीच हाडं असल्याचा निष्कर्ष दिला होता. आता सांगाडा आणि हाडं गायब झाल्याने डॉ. जेबा खान यांचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास सरकारी वकिलांनी तयारी दर्शवली आहे. प्रकरण कमकुवत करण्यासाठी सांगाडा आणि हाडं गायब केलीत का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

शीनाची हत्या कोणी केली?
शीना बोराची हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जीने केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर रायने 2012 मध्ये शीना बोराची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह रायगड जिल्ह्यातील पेन गावात आणला आणि तिथे तो जाळण्यात आल्याचा आरोप आहे. 

पेन पोलिसांनी 2012 मध्ये मृतदेहाचे अवशेष जप्त केले आणि तपासासाठीते जे जे रुग्णालयात पाठवले. 2015 पर्यंत हे प्रकरणात गुंतागुंत सुरुच होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामराव राय याच्या अटकेनंतर हत्याकांडाचा खुलासा झाला. 2015 मध्ये मुंबई पोलिसांनी रायगडमध्ये जाऊन आणखी काही अवशेष जप्त केले. हे अवशेष तपासासाठी दिल्लीत एम्समध्ये पाठवण्यात आले. 2012 मध्ये सापडले अवशेष आणि 2015 मध्ये सापडले अवशेष एकाच व्यक्तीचे आहेत की नाही, मृतदेहाचं वय आणि मृत्यूचं कारण शोधण्यासाठी हाडं आणि सांगाडा ठेवण्यता आला होता.

सीबीआयने ही हाडं आणि सांगाडा शीना बोराचाच असल्याचा दावा केा आहेत. इंद्राणी मुखर्जी हिेचे वकिल रंजीत सांगळे यांनी मात्र सीबीआयचा हा दावा खोडून काढला आहे. 2012 आणि 2015 मध्ये जप्त केलेले अवशेष एकाच व्यक्तीचे नसल्याचं वकिल रंजी सांगळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.