नवनीत राणा आणि रवी राणा यांना हायकोर्टाचा झटका

नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet rana and Ravi Rana) यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

Updated: Apr 25, 2022, 04:52 PM IST
नवनीत राणा आणि रवी राणा यांना हायकोर्टाचा झटका title=

मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet rana and Ravi Rana) यांच्या याचिकेवर हायकोर्टात दोन्ही बाजूनी सुनावणी पूर्ण झाली आहे. राणा दाम्पत्याचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी राणांवर दोन FIR दाखल करण्यावर आक्षेप घेतला होता. FIR नोंदवताना कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नसल्याचं मर्चंट यांनी म्हटलं आहे. तर राणांना केवळ हनुमान चालिसा वाचायची नव्हती, तर सरकारी यंत्रणांना आव्हान द्यायचं होतं असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी केला आहे.

राणा यांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेत केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. 

नवनीत राणा आणि रवी राणा यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. कोर्टाने म्हटलं की, त्यांनी पठण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या  एफआयआरमधील विधान असे आहे की याचिकाकर्त्यांनी एक विशिष्ट कृत्य केल्याची घोषणा स्वतःच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारी होती आणि काही प्रतिक्रिया होण्याची भीती होती ज्याचे परिणाम संपूर्ण यंत्रणेला भोगावे लागतील.'

प्राथमिकदृष्ट्या असे दिसून येते की कायदा आणि सुव्यवस्था बिघडवले आहे. लोकप्रतिनिधी असल्याने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. एखादा व्यक्ती आपली धार्मिक आस्था दुसऱ्याच्या घरी किंवा सार्वजनिक ठीकणी असे कृत्य करतो. तेव्हा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असतो. असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.

'दोन्ही गुन्हे वेगवेगळेच राहतील. दुसऱ्या गुन्ह्यात म्हणजेच 353 च्या गुन्हयात कारवाई करण्यापूर्वी 72 तास आधी नोटीस द्यावी लागणार.' असं ही कोर्टाने म्हटले आहे.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x