मुंबई : महाराष्ट्राची धैर्यकन्या मोनिका मोरे आता हाताच्या प्रत्यारोपणाकरिता सज्ज झालीय. ज्यारितीने अवयवदान केल्यानंतर अवयव प्रत्यारोपण होते, त्याच पद्धतीने मोनिकाच्या हाताचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय मोनिकाच्या कुटुंबीयांनी घेतलाय.
जानेवारी २०१४ मध्ये घाटकोपर इथल्या अपघातात मोनिकाने आपले दोन हात गमावले होते. यानंतर मोनिकाबाबत तिचे कुटुंबीय चिंतीत होते. हाताचे प्रत्यारोपणचा पर्याय समोर आल्यानंतर ते कसं करायचं, शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढे काय होईल याची मोनिकाच्या कुटुंबीयांना शंका होती. मात्र कोची इथं राहणारी आणि इंजीनिअरिंगची विद्यार्थिनी श्रेयाला भेटल्यानंतर मोनिकाचे वडील अशोक मोरे यांनी मोनिकाच्या हात प्रत्यारोपणाता निर्णय पक्का केलाय.