गोरेगावमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला

 ड्रग्ज पेडलर्सच्या ५० ते ६० जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला.

Updated: Nov 23, 2020, 01:27 PM IST
गोरेगावमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला  title=

मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणानंतर (Sushant singh Rajput Sucide) एनसीबीची टीम (NCB) ड्रग्ज कनेक्शनच्या (Drugs Connection) शोधात आहे. त्यामुळे ड्रग्ज पेडलर्सचे (Drugs Peddler) धाबे दणाणले आहे. ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या टीमवर ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. एनसीबीच्या ५ अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलरकडून हा हल्ला झालाय. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ही घटना घडली. ड्रग्ज पेडलर्सच्या ५० ते ६० जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला.

समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) अंतर्गत एनसीबीती ही टीम मुंबईत काम करत आहे. हल्ला झाला त्यावेळी समीर स्वत: तिथे होते का ? याची माहिती समोर आले नाही. पण एनसीबीचे दोन अधिकारी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेयत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इतर ३ अधिकारी सुरक्षित आहेत. 

ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. आणि संधी साधून त्यांनी हा हल्ला केला. या प्रकरणाचा अधिक तपास एनसीबी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मुंबई पोलीस करत आहेत.