Mumbai Drug Case : आर्यन खानला दिलासा नाहीच, जेलमधला मुक्काम वाढला

आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे

Updated: Oct 4, 2021, 07:01 PM IST
Mumbai Drug Case : आर्यन खानला दिलासा नाहीच, जेलमधला मुक्काम वाढला title=

नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी मुंबईत सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Rave Party) छापा टाकला. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांची रविवारी संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आली त्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) सर्व आरोपींना अटक करण्यात आली. आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी करण्यात आली.

यावेळी आर्यन खानसह 3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी (NCB's Custody) सुनावण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात ( Mumbai drug bust case) आर्यन व्यतिरिक्त अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचासह (Munmun Dhamecha) एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या फोनवरून संशयास्पद व्यवहारांचाही उल्लेख आहे. तसंच, ड्रग्स खरेदीसाठी अनेक कोड नेम वापरले गेले आहेत.

एनसीबीने मागितली होती कोठडी

एनसीबीने न्यायालयाकडून आरोपींची 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली होती. सुनावणीदरम्यान एनसीबीने आर्यन खानच्या फोनमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह फोटोबद्दल सांगितलं. यासह अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन देण्यास नकार दिला आणि एनसीबीला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली.

एनसीबीने न्यायालयात बाजू मांडताना म्हटलं  'जर आरोपींना एनसीबी कोठडी मिळाली नाही तर ड्रग्स त्यांच्यापर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचले हे स्पष्ट होणार नाही. सर्वात मोठी चिंता तरुणांची आहे, त्यांच्या ड्रग्स घेण्याने संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रभावित होऊ शकतो. ही लोकं तरुणांसाठी रोल मॉडेल आहेत, त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे, एनबीसीतर्फे न्यायालयात सांगण्यात आलं. 

आर्यन खानच्या वकीलांचा युक्तीवाद

प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानच्या बाजूने युक्तीवाद केला. आर्यनचा drugs trafficking शी काहीही संबंध नाही. आर्यन परदेशात असतानाचे चॅटस डाऊनलोड करण्यात आले आहेत, ज्याचा संबंध ते आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांशी लावत आहेत. जर आर्यनने त्याच्या मित्रांसमवेत ड्रग्सबाबत चॅट केलं असेल तरी ते एखादं रॅकेट चालवतात असं कुठेही दिसत नाही आणि असं म्हणताही येणार नाही. NDPS अंतर्गत सगळे गुन्हे हे जामीनपात्र आहेत.   
जामीन याचिकेवर विचार करावा. केवळ व्हाट्सएप चॅटच्या आधारे रिमांड मागत आहेत त्याला काही आधार नाही, असं सतीश मानेशिंदे यांनी आर्यनच्या बचावात युक्तीवाद केला.