मुंबई-डेहराडून विमानाचं इमरजन्सी लँडिंग

मुंबई -डेहराडून विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 9, 2017, 03:37 PM IST
मुंबई-डेहराडून विमानाचं इमरजन्सी लँडिंग  title=

मुंबई : मुंबई -डेहराडून विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

एका प्रवाशाकडे चाकू सापडल्याने विमानाचं तातडीने लँडिंग करण्यात आले. या विमानातील सीट नंबर १६ डीईफवर बसलेल्या प्रवाशाकडे हा चाकू आढळून आलाय. प्रवाशाने सफरचंद कापण्यासाठी हा चाकू काढल्याचे बोललं जातं आहे. मात्र प्रवाशाच्या हँड बॅगेजमध्ये चाकू गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार कोण असाही सवाल या निमित्ताने विचारला जातोय. 

इमरजन्सी लँडिंग केल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. पण पुन्हा या घटनेवरून एअरपोर्टवरील सेवा किती निष्काळजीपणाची आहे हे यावरून लक्षात आलं आहे.