शिक्षण केमिस्ट्रीचं मात्र मास्टरकी अंमलीपदार्थ बनवण्यात, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

मुंबईजवळून तब्बल चौदाशे कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त  

Updated: Aug 4, 2022, 04:38 PM IST
शिक्षण केमिस्ट्रीचं मात्र मास्टरकी अंमलीपदार्थ बनवण्यात, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : विविध गुन्ह्यांकरता कुख्यात असलेलं नालासोपारा आता अंमली पदार्थनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरतेय की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थविरोधी सेलने नुकत्याच केलेल्या कारवाईत या परिसरातून तब्बल 1,400 कोटी रुपये किमतीचे 700 किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. त्यामुळे नालासोपारा हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

नालासोपारा पश्चिम हनुमान नगर इथल्या एका औषध निर्मिती युनिटवर छापा टाकल्यानंतर इथं प्रतिबंधित औषध मेफेड्रोन तयार करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर नालासोपारा इथं एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. अलीकडच्या काळात पकडलेला हा सर्वात मोठी अंमली पदार्थ साठा असल्याचं सांगितलं जातंय.

आरोपीने ऑरगॅनिक केमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं आहे. वेगवेगळी केमिकल एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून एमडी (मॅफेड्रॉन) हा मादक पदार्थ बनविण्यात तो मास्टर होता. मागणीप्रमाणे तो हा पदार्थ गिऱ्हाईकांना विकत असे, अशी माहिती प्राथमिक तपासात या युनिटला मिळाली होती. स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हा आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.