शुल्लक कारणावरुन मित्रालाच हातोड्याने संपवलं; आरोपीला बोरिवलीतून अटक

Mumbai Crime : बोरीवलीमध्ये घडलेल्या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मित्राच्या हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 11, 2023, 12:16 PM IST
शुल्लक कारणावरुन मित्रालाच हातोड्याने संपवलं; आरोपीला बोरिवलीतून अटक title=
(फोटो सौजन्य - ANI)

Mumbai Crime : मुंबईत (Mumbai News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे चिडवण्यावरून दोन मित्रांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात एकाने दुसऱ्याची हत्या केली. शनिवारी पहाटे बोरिवलीमध्ये (Borivali) एका व्यक्तीने आपल्या मित्रावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने हातोडी आणि चाकूने मित्राची हत्या केल्याचे पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राम पुकार साहनी आहे, तर मृताचे नाव अजित कुमार साहनी आहे. दोघेही देवीपाडा परिसरात राहत होते आणि गवंडी म्हणून काम करत होते. दोघेही अनेकदा एकाच ठिकाणी काम करायचे आणि एकत्र ये-जा करायचे. राम पुकार हा अजितचा नेहमी अपमान करायचा आणि यामुळे तो संतापला होता. यावरून झालेल्या हाणामारीतून अजितची हत्या झाल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शनिवारी रात्री रामच्या अश्लील शेरेबाजीवरून दोन मित्रांमध्ये भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. हाणामारीत रामने अजितच्या डोक्यावर हातोड्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी राम घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला काही तासांतच बोरिवली येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीएस) कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

नेमकं काय झालं?

कामावरुन चिडवल्याच्या रागातून झालेल्या हाणामारीनंतर एका मित्राने दुसऱ्या मित्रावर हातोड्याने हल्ला करत त्याचा खून केला आहे. कस्तुरबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित कुमार सहनी (33)  आणि राम पुकार सहानी (30) हे दोघेही बोरीवली पूर्वच्या देवीपाडा परिसरात एका घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. दोघेही एकाच  गावचे होते. त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टींवरुन वाद होत होते. आरोपी राम पुकार हा सातत्याने अजित कुमार याला चिडवायचा. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास राम पुकारने पुन्हा अजितची खोड काढली. तू कायमच कडिया राहणार आहेस, तुला मिस्त्री कधीही बनता येणार नाही, असे म्हणत राम पुकारने अजितला डिवचलं. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. राम पुकारने अजितवर सुरुवातीला चाकून वार केले. त्यानंतर त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राम पुकारने अजितच्या डोक्यात हातोडा घातला. यातच अजितचा मृत्यू झाला.