Mumbai Crime: मित्र मैत्रिणीच्या नात्यात आपण एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतो. आपण एकमेंकांना अडल्या नडल्यास मदत करतो. पण आपल्याच मैत्रिणीने आपल्या मैत्रिचा गैरफायदा घेतला तर? हो. अंधेरीत ही घटना घडलीय. ती ऐकून तुमचा मैत्रीच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न झालाय.
अंधेरी येथे राहणाऱ्या अंजलीला कल्याणमधील एका मित्राने यूपीएसची तयारीसाठी लॅपटॉप दिला. आपली मैत्रिण लॅपटॉपच्या मदतीने अभ्यास करेल, अशी प्रामाणिक भावना त्यामागे होती. मात्र मित्राचा मदतीचा गैरफायदा तिने घेतला. अभ्यास तर दूरच पण तिने चक्क तो लॅपटॉप विकला. काही पैशांसाठी तिने हा कारनामा केला.
काही दिवस असेच गेले. आता मित्र त्याचा लॅपटॉप परत मागत होता. पण लॅपटॉप परत करू शकत नसल्याने तिच्या लक्षात आले. तिने आयडिया केली आणि लुटीचा बनाव केला. मात्र कल्याण पोलिसांनी तिचा कट उघडकीस आणून अटक केली. अंजली पांडे नावाची तरुणी अंधेरी येथे राहते. ती यूपीएससी परिक्षेची तयारी करीत होती. तिचा मित्र कल्याणमध्ये राहतो. यूपीएसची तयारी करण्यासाठी तिने तिच्या मित्राकडून लॅपटॉप घेतला होता. पैशाची चणचण होती म्हूणन तिने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकून टाकला. आत्ता मित्र लॅपटॉप परत मागत होता. विकलेला लॅपटॉप कसा परत द्यायचा? अंजली हिने एक कट रचला.
18 मे रोजी 7.30 वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील जे प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या पार्किंगमध्ये तिने एका दुकानातून कास्टींग सोडा घेतला आणि स्वत:च्या अंगावर पसरवला. यामुळे तिच्या मानेवर जखमेसारखे डाग दिसू लागले. चोर आले त्यांनी माझ्या अंगावर केमीकल टाकले आणि माझ्याकडील लॅपटॉप घेऊन पळाले, असे आरोपी मुलीने सांगितले. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तिने यासंदर्भात तक्रार केली.
यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी मुलगी जिथे गेली होती तिथले आजुबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. यानंतर एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ती दिसली. या फुटजेमध्ये ती दुकानातून कास्टिंग सोडा विकत घेताना दिसतली. ज्या दुकानातून तिने सोडा खरेदी केला होता तिथे पोलीस पोहोचले. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. पोलिसांनी याची अधिक चौकशी केली. आता अंजलीच्या विरोधात सुत्र फिरु लागली. यानंतर आपण मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकला आणि तो पुन्हा परत करता येत नसल्याने हा कट रचल्याचे तिने सांगितले. कोळसेवाडी पोलीस ठाणे येथील निरीक्षक अशोक कदम यांनी दिली. पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई केली जात आहे.