Mumbai Crime News: मुलाने पँटमध्येच लघुशंका केली. यामुळं चिडलेल्या 19 वर्षीय तरुणाने चिमुरड्याच्या पोटात लाथ मारली. चिमुरड्याला इतक्या जोरात मार बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. नेहरु नगर पोलिसांनी आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 4 वर्षांच्या मुलाची हत्या करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आरोपी मुलाच्या आईचा प्रियकर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव रितेश चंद्रवंशी आहे. चिमुरड्याची आई घरात नसताना त्याने मुलाच्या पोटात लात मारली. आई घरात नसतानाच चिमुरड्याने पँटमध्येच लघुशंका केली. त्यामुळं रितेश मुलावर चिडला आणि त्याने त्याच्या पोटात लाथ मारली. त्यामुळं तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली रितेशला अटक केली आहे.
नेहरु नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलाची आई कुर्ला पूर्व येथे एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करते. पतीपासून तिला दोन मुलं आहेत. जे बिहारमध्ये राहत होते. मात्र, सतत होणाऱ्या भांडणांना वैतागून ते वेगळे झाले. त्यानंतर महिला नाशिकमध्ये तिच्या नातेवाईंकासोबत राहायला आली. नाशिकमध्ये तिची मैत्री रितेश कुमारसोबत झाली. त्यानंतर ते दोघंही प्रेमात पडले. मेमध्ये दोघे नाशिकमध्ये कुर्ला पूर्वमध्ये नेहरू नगर झोपडपट्टीत राहत होते.
आरोपांनुसार, 26 ऑक्टोबर रोजी महिला एका कामासाठी घराबाहेर गेला होता. रितेशच्या भरोश्यावर ती मुलाला घरी ठेवून गेली होती. जेव्हा ती घरी आली तेव्हा मुलगा रडत होता. व सतत पोट दुखतंय असं सांगत होता. आईने जेव्हा कारण विचारलं तेव्हा त्याने आरोपीने लात मारल्याचं सांगितलं. महिलने जेव्हा रितेशला जाब विचारला तेव्हा त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर महिला मुलाला घेऊन स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेली. तिथे तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. राजावाडी डॉक्टरांनी सल्ला दिला की, सायन रुग्णालयात घेऊन जा. मुलाला सायन रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्याने उलटी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मुलाचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मुलाच्या पोटात अंतर्गंत अवयवकांना इजा झाली होती. पोलिसांनी रितेशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कबुल केलं की रागाच्या भरात त्याने मुलाच्या पोटात लाथ मारली.