१४ हजार रुद्राक्ष, २८ रंग वापरून साकारले शिवाजी महाराज

मुंबईचे कलाकार चेतन राऊत यांनी शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलं आहे. 

Updated: Sep 12, 2018, 07:05 PM IST
१४ हजार रुद्राक्ष, २८ रंग वापरून साकारले शिवाजी महाराज title=

मुंबई : मुंबईचे कलाकार चेतन राऊत यांनी शिवाजी महाराजांचं चित्र रेखाटलं आहे. यासाठी चेतन राऊत यांनी १४ हजार रुद्राक्ष आणि २८ रंगांचा वापर केला आहे. हा माझा ५वा विश्व विक्रम असल्याचं चेतन राऊत यांनी सांगितलं आहे. शिवाजी महाराजांच्या या आगळ्यावेगळ्या चित्राचा समावेश इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड आणि यूनिक वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही करण्यात आला आहे.