Mumbai Air Quality Index: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, मुंबईतील प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे होत असलेली बांधकामे. आज म्हणजेच 2५ऑक्टोबर रोजी मुंबईतील हवेचा दर्जा निर्देशांक 163 वर नोंदवला गेला आहे. विषारी हवेमुळे लोकांना श्वास घेणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. हवेतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे, मोठ्या संख्येने लोकांना दमा आणि सीओपीडी सारख्या फुफ्फुसाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालये आणि डॉक्टरांच्या दवाखान्यातही रुग्णांची गर्दी सातत्याने वाढत आहे.
मुंबईतील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहतूक. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते महानगरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणाची पातळीही वाढत आहे. खरं तर इथे सतत होत असलेल्या कामांमुळे धूळ-मातीचे प्रमाण वाढले आहे. कंस्ट्रक्शन साइटवर पाण्याचा वापर कमी केला जातोय. यामुळे धूळ-माती पर्यावरणात मिसळत आहे. मुंबईत खराब हवामानाचे हे प्रमुख कारण आहे.
वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी… pic.twitter.com/J4CzqlYo8F
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 22, 2023
मुंबईतील खालावत चाललेल्या हवेबाबत महापालिकाही अत्यंत गंभीर आहे. धूळ कमी करण्यासाठी महापालिका मुंबईत ठिकठिकाणी अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर वापरत आहे. यासंदर्भात बीएमसीकडून मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच लोखंडी पत्र्याचे कुंपण देखील अनिवार्य करण्यात आले आहेत. एक एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकामाच्या जागेसाठी लोखंडी पत्र्याचे कुंपण २५ फूट उंच असेल. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला हिरवे कापड/ज्युट शीट/टारपॉलीन वेढले जाईल.
बांधकामाचा भंगार वाहून नेणारी सर्व वाहतूक वाहने ताडपत्रीने व्यवस्थित झाकलेली असावीत. अशा कोणत्याही वाहनाला विहित वजनापेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची परवानगी नाही. तसेच अशा सर्व वाहनांचे टायर बांधकामाच्या ठिकाणी सोडण्यापूर्वी आणि रस्त्यावरून जाण्यापूर्वी धूळ काढण्यासाठी अनिवार्यपणे साफ करणे आवश्यक आहे. त्यांच्यावर पाणी शिंपडले जाईल.