इलेक्ट्रिक सायकलमुळे फातिमा खानचं आयुष्य सुकरं

 नव्या सायकलमुळे फातीमाचं आयुष्य सुकर झालंय.

Updated: Aug 27, 2018, 11:22 AM IST

मुंबई : मॉसी की चाय सध्या चांगलाच चर्चेत आहे. अपंगात्वावर मात करत चहाचा धंदा करणाऱ्या फातिमा खानला मिळालेल्या नव्या सवारीमळे तिच्या स्वप्नांना बळ मिळालंय. काही वर्षांपुर्वी रेल्वे अपघातात फातिमाने दोन्ही पाय गमावले, त्या दुखातुन ती सावरत नाही तोच तिच्या लहान मुलाचं अपघाती निधन झालं.

आयुष्य सुकर

त्यानंतर घराची आणि नातवंडाची संपुर्ण जबाबदारी फातिमाने आपल्या चहाच्या धंद्यातून दोन पैसे कमवत पुर्ण केली. मात्र या सगळ्यात तिला सायकलमुळे प्रचंड त्रास होत होता. आदिनाथ फाउंडेशनने फतिमाला फिरता येईल आणि चहाचा व्यवसायदेखील करता येईल अशी इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल दिली. नव्या सायकलमुळे फातीमाचं आयुष्य सुकर झालंय.