हँडल लॉक नसणाऱ्या गाड्यांची चोरी, बंटी-बबली दाम्पत्याला अटक

 मानखुर्द पोलिसांनी गाडी चोरी करणाऱ्या बंटी बबली दाम्पत्याला अटक केली. 

Updated: Dec 26, 2018, 10:59 PM IST
हँडल लॉक नसणाऱ्या गाड्यांची चोरी, बंटी-बबली दाम्पत्याला अटक title=

मुंबई : मानखुर्द पोलिसांनी बंटी बबली दाम्पत्याला अटक केली. हे दाम्पत्य रस्त्यावर हँडल लॉक नसणाऱ्या गाड्या चोरत आणि नंतर या गाड्यांचे भाग वेगळे करून विकत असत. रफिक शेख आणि जरीना शेख असं या नवरा बायकोचे नाव आहे. ते मुंबईच्या शिवाजी नगर विभागात रहातात. 

रफिक हा मॅकेनिक म्हणून एक गॅरेज चालवतो. त्यामुळे त्याला दुचाकीची चावी नसताना ही दुचाकी चालू करण्याचे तंत्र अवगत होतं. रफिक आणि त्याची बायको जरीना हे रात्री रिक्षातून विभागात रेकी करत. हँडल लॉक नसलेल्या दुचाकी शोधून काढत आणि त्या विकत. आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात त्यांच्या नावावर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे.