अखेर, मुलुंडचं डम्पिंग ग्राऊंड बंद होणार

 मुंबई महापालिकेनं त्यासाठी साडे पाचशे कोटी रुपयांचं कंत्राट दिलंय

Updated: Aug 10, 2018, 04:39 PM IST

मुंबई : मुलुंडचे डम्पिंग ग्राऊंड अखेर येत्या २ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यानंतर ७० लाख टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. हजारो कोटी रुपये किंमतीची ६० एकर जागा मोकळी होणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीत साचलेले कचऱ्याचे डोंगर नाहीसे होणार आहेत. 

मुलुंडमध्ये होणारा हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा डम्पिंग ग्राऊंड रिक्लेमेशन प्रकल्प ठरणार आहे. मुंबई महापालिकेनं त्यासाठी साडे पाचशे कोटी रुपयांचं कंत्राट दिलंय. 

मुलुंडवरील कचऱ्याचा भार आता कांजूर आणि देवनारची डंम्पिंग ग्राऊंड पेलणार आहेत. कचऱ्याच्या प्रत्येक घटकाची विल्हेवाट लावली जाणार आहे.