मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Vidyapeeth Bharti 2023: मुंबई विद्यापीठातील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट mu.ac.in वर  22 सप्टेंबर 2013 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2023, 01:24 PM IST
मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज  title=

Mumbai Vidyapeeth Bharti 2023: मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती अंतर्गत संचालक, कुलसचिव, डीन, वित्त आणि लेखा अधिकारी अशा विविध पदांच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट mu.ac.in वर  22 सप्टेंबर 2013 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रजिस्टार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून 55 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी मास्टर डिग्री पूर्ण केलेली असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 31 हजार 100 ते 2 लाख 16 हजार 600 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.फायनान्स आणि अकाऊंट ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार चार्टट अकाऊंटंट असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 31 हजार 100 ते 2 लाख 16 हजार 600 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. डायरेक्टर, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक/कॉम्प्युटर/आयटी किंवा एमसीएमधून बीए/बीटेक/एमएससी पूर्ण असावे. उमेदवाराला संबंधित कामाचा किमान 20 वर्षांचा अनुभव असावा.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 44 हजार 200 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

58 वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 250 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रत इनवर्ड सेक्शन, रूम नंबर 25, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई – 400 032 या पत्त्यावर पाठवायची आहे.  16 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

Amazon देतेय 1 लाखाहून अधिक नोकऱ्या

Amazon India ने 8 ऑक्टोबरपासून Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणला आहे. ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू शिप पॅक करुन ग्राहकांच्या ऑर्डर वितरीत करण्यासाठी अमेझॉनला मॅनपॉवरची गरज आहे.
मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई या शहरांमध्ये अमेझॉनचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये ही भरती केली जाईल. येथे Amazon मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध करून देईल. नवीन नियुक्त्यांमध्ये कस्टमर सपोर्ट असिस्टंटचाही समावेश आहे. ज्यापैकी काही व्हर्च्युअल ग्राहक सेवा मॉडेलचा भाग आहेत. देशभरात स्वत:चा ठसा मजबूत करताना ग्राहकांना चांगला अनुभव प्रदान करणे, हे यामागचे उद्दीष्ट्य आहे. Amazon India ची 15 राज्यांमध्ये पूर्तता केंद्रे आहेत. त्यांच्याकडे विक्रेत्यांच्या यादीसाठी 43 दशलक्ष घनफूट स्टोरेज स्पेस आहे. याचा फायदा देशातील 13 लाखांहून अधिक विक्रेत्यांना होतो. कंपनीची 19 राज्यांमध्ये वर्गीकरण केंद्रे आहेत. तसेच जवळपास 2 हजार Amazon संचालित आणि भागीदार वितरण स्टेशनचे नेटवर्क आहे.

Railway Job: मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज