Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी शहरांत मेट्रोचे जाळे पसरवण्यात येत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मुंबईतील अनेक ठिकाणी मेट्रोचे प्रकल्प सुरू करत आहेत. मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील पहिला भूमिगत मेट्रो ३ प्रकल्पाची यशस्वी चाचणी पार पडली आहे. मेट्रोने एमआयडीसी ते विद्यानगरीपर्यंत ही 8 किलोमीटर मार्गावरील सहा स्थानके यशस्वीरित्या पार केली. त्यानंतर सीप्झ स्थानकात परत येत मेट्रोने तब्बल 17 किमी अंतराची चाचणी पूर्ण केली आहे. (Mumbai Metro 3 Project)
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मेट्रो 3 मार्गावर यशस्वीरित्या चाचणी पूर्ण केली आहे. एमआयडीसी ते विद्या नगरी पर्यंत ही मेट्रो अप-डाऊन मार्गावरती चालण्यात आली. एमआयडीसी ते विद्या नगरी स्थानकाअतर्गंत १७ किमी अंडरग्राउंड टनलमध्ये मेट्रोची अप-डाऊन मार्गावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. मेट्रो-3 मार्गावर देशातील सर्वात मोठा भूमिगत मार्ग आहे. मुंबई मेट्रो तीन पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचा विचार आहे.
मुंबई मेट्रो-3 ही आरे ते कफ परेड अशी 33 किमी लांबीची मार्गिका आहे. त्यावर एकूण 27 स्थानके असून त्यापैकी दहा स्थानकांचा म्हणजेच, आरे कॉलनी ते बीकेसीपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. डिसेंबर 2023पर्यंत पहिला टप्पा सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.
#Metro3 achieves yet another significant milestone. Train movement was successfully carried out today between #MIDC to #Vidyanagari metro station. The train will travel back to SEEPZ covering a total distance of around 17 km during the run. #Metro3Updates#MumbaiUnderground pic.twitter.com/2ponZDGsR1
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) October 7, 2023
मेट्रोचा पहिला टप्पा आरे कॉलनी ते बीकेसीपर्यंत असून यात 10 स्थानके असणार आहेत. यात ९ अंडरग्राउंड स्थानके आहेत. पहिल्या टप्प्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, इंटरनॅशनल एअरपोर्ट, सहार रोड,डोमॅस्टिक एअरपॉर्ट, सांतक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी, अशी स्थानके पहिल्या टप्प्यात असतील.
मुंबई मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्यातील काम 91 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर साइनेज आणि फिनिशिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. मरोळ नाका आणि एमआयडीसी स्थानक अॅडव्हान्स कप्लीशन स्टेजवर आहेत. त्याबरोबर आरे येथील मेट्रो स्थानक पूर्णपणे तयार झाले आहे. मुंबई मेट्रो 3च्या पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये प्रवाशांसाठी खुला होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच तशी घोषणा केली होती. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.