Mahalakshmi Race Course : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हलवण्याच्या हालचाली, या ठिकाणचा प्रस्ताव

Mumbai Mahalakshmi Race Course : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आता दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहे. हे रेसकोर्स कुठे होणार याची उत्सुकता आहे.  

Updated: Jan 7, 2023, 09:48 AM IST
Mahalakshmi Race Course : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हलवण्याच्या हालचाली, या ठिकाणचा प्रस्ताव  title=

Mahalakshmi Race Course in Mumbai : मुंबई संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. (Mumbai News) दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स दुसरीकडे हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून (BMC) रेसकोर्सच्या जागेवर मोठे थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalakshmi Race Course) मुंबईतच दुसरीकडे हलविण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai Marathi News)

रेसकोर्स जागेचा ताबा घेण्यासाठी बीएमसीचे प्रयत्न

महालक्ष्मीऐवजी आता रेसकोर्स  (Mahalakshmi Race Course) मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राऊंडचा (Mulund Dumping Ground) परिसर साधारणपणे 24 हेक्टरचा आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचं लीज काही वर्षांपूर्वीच संपले आहे. त्यामुळे या जागेचा ताबा पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी बीएमसी राज्य सरकारला लवकरच लिहिणार आहे. मात्र रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला बदली जागा देण्यात येईल. 

रेसकोर्सच्या जागेवर थिम पार्क उभारण्याचा प्रस्ताव 

मुलुंडचं बंद पडलेलं डम्पिंग ग्राऊंड आणि त्याच्या शेजारील खासगी मालकीची जमीन रेसकोर्ससाठी पुरेशी आहे, असे सांगितलं जात आहे. 1914 पासून बीएमसीने रेसकोर्ससाठी ही जागा रॉयल इंडिया टर्फ क्लब 99 वर्षांच्या कराराने दिली आहे. या रेसकोर्सच्या जागेवर थिम पार्क उभारण्याचा बीएमसीचा प्रस्ताव आहे. मात्र खासगी जमीन सध्याच्या बाजारभावानुसार खरेदी करणं बीएमसीला महाग पडेल, अशी शक्यता आहे. मात्र निव्वळ रेसकोर्सला देण्यासाठी महागड्या दराने जागा खरेदी करणं गरजेचं आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

रेसकोर्सचे थीम पार्कमध्ये रुपांतर करण्यासाठी 2013 मध्येच ठराव 

दरम्यान, एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएमसीने रेसकोर्सच्या जागेचे थीम पार्कमध्ये रुपांतर करण्यासाठी 2013 मध्ये आधीच ठराव केला होता. राज्याला रेसकोर्सच्या जमिनीचा भाग तसेच बीएमसीला देण्यास सांगण्याची योजना आहे. ज्याला सर्वसमावेशकपणे उद्यानात रुपांतरित करण्याची त्यांची योजना आहे. बीएमसी 2013 पासून कोणतेही भाडे स्वीकारत नाही. 

2018 मध्ये बंद करण्यात आलेल्या मुलुंड लँडफिलमध्ये सुमारे 7 दशलक्ष घनमीटर कचरा होता, ज्यावर वैज्ञानिक पद्धती वापरुन प्रक्रिया केली जाणार होती. कचऱ्याचे विघटन करण्यासाठी आणि जमिनीवर सहा वर्षांत पुन्हा दावा करण्यासाठी एन्झाइम्सचा वापर केला जाणार होता, परंतु अद्याप काम पूर्ण झालेले नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 650 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.