Mumbai News: सिक्युरिटी गार्डला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्यास मनसेचा चोप; पाहा Video

MNS workers Andheri News:  सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) पगार थकवून त्याच्या पत्नीशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्ते दिनेश अहिरे यांनी चोप दिला. अंधेरी येथील कंपनीत जावून मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला.

Updated: Aug 11, 2023, 08:16 PM IST
Mumbai News: सिक्युरिटी गार्डला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्यास मनसेचा चोप; पाहा Video title=

Mumbai MNS Viral Video : मुंबईमध्ये (Mumbai News) मराठी माणसांचा टक्का खालावल्याचं गेल्या अनेक वर्षात चित्र आहे. अशातच विरार येथे राहणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) पगार थकवून त्याच्या पत्नीशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्ते दिनेश अहिरे यांनी चोप दिला. अंधेरी येथील कंपनीत जावून मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला. त्याचा हा व्हिडिओ (Viral Video) आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंधेरी (Andheri News) येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या मराठी व्यक्तीला लोकांनी अचानक कामावरून काढून टाकलं. त्याचा जाब विचारण्यासाठी मराठी कामगाराने कंपनीत कॉल केला व जाब विचारला त्यानंतर कंपनीतील नीरज नावाच्या व्यक्तीने सिक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या कामगाराच्या पत्नीला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. त्या व्यक्तीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर मनसे अॅक्शन मोडमध्ये आली. मनसेच्या कार्यालयातून दिनेश अहिरे यांनी अंधेरी येथे सिक्युरिटी ऑफिसमध्ये कॉल करून नीरज नामक व्यक्तीबरोबर बोलणं केलं.

आणखी वाचा - लेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की...

फोनमध्ये नीरजने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ही अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली त्यामुळे विरार येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अंधेरी नीरज या व्यक्तीला चोप दिला. महिलेला अर्वाच्य भाषेमध्ये बोलणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना समज दिली. सदर व्यक्तीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मनसे पदाधिकारी यांची माफी मागितली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.