मनसेवर काय वेळ आली? नेत्यांची सारवासारव!

आंदोलनाला अवघे ४८ तास उलटत नाहीत तोपर्यंत मनसे आणि रेल्वे प्रशिक्षणार्थी यांच्यातले मतभेद चव्हाट्यावर आलेत. तेही एका संयुक्त पत्रकार परिषदेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 23, 2018, 06:20 PM IST
मनसेवर काय वेळ आली? नेत्यांची सारवासारव! title=

मुंबई : आंदोलनाला  अवघे ४८ तास उलटत नाहीत तोपर्यंत मनसे आणि रेल्वे प्रशिक्षणार्थी यांच्यातले मतभेद चव्हाट्यावर आलेत. तेही एका संयुक्त पत्रकार परिषदेत. २० मार्चला रेल्वे भरतीच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केलेल्या आंदोलनानंतर मनसे नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आज मनसेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी दिल्लीत रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या भेटीतील चर्चेत आमचं समाधान झाल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

या चर्चेत प्रशिक्षणार्थींना नोकरीसाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागेल, असं ठरलं. मात्र पत्रकार परिषदेत प्रशिक्षाणारथींचे नेतृत्व करणाऱ्या भरत परदेशी यांनी आम्ही पुन्हा परीक्षा देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली.  त्यानंतर मनसे नेत्यांना सारवासारव करीत पत्रकार परिषद आटोपती घ्यावी लागली.  

पियुष गोयल यांची भेट

दरम्यान, मनसे शिष्टमंडळाने दिल्लीत २१ मार्च रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. रेल्वे प्रशिक्षणार्थींची नोकर भरतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.  २० टक्के राखीव कोट्यातून त्यांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आलेय. रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मनसेचे शिष्टमंडळामध्ये रेल्वेचे प्रशिक्षणार्थींनी विद्यार्थ्यांच्या नोकरभरतीसंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले.

 राज ठाकरे यांची भेट

रेल्वेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी संपूर्ण भारतातून हजारोच्या संख्येने आलेले रेल्वे प्रशिक्षणार्थींनी काल मुंबईत दादर ते माटुंगा दरम्यान आंदोलन केले होते. त्यावेळी रेल्वे प्रशासनामार्फत अमानुषपणे लाठीमार करण्यात आला होता. त्याच दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी नोकर भरतीच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांची भेट घेतली. 

विद्यार्थ्यांना आश्वासन देऊन मनसे अध्यक्ष राजसाहेबांनी मनसे नेत्यांच्या शिष्टमंडळास रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्यास सांगितले होते. रेल्वे ॲक्ट ॲप्रेंटिसच्या विविध मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थिंसह  मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, सरचिटणीस मनोज चव्हाण, संदीप देशपांडे, मनसे रेल्वे सेनेचे सरचिटणीस जितु पाटील यांचे शिष्टमंडळ आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. 

सकारात्मक चर्चा

रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मनसेचे शिष्टमंडळामध्ये रेल्वेचे प्रशिणार्थीनी विद्यार्थ्यांच्या नोकरभरतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. आता नव्याने होणाऱ्या नोकर भरतीत रेल्वे बोर्ड प्रणालीने ठरविलेल्या २० टक्के राखीव कोट्याअंतर्गत रेल्वेमध्ये अप्रेंटिस केलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनाच सामावून घेतले जाईल, असे आश्वासन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले. तसेच रेल्वे अप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या नोकरी नियुक्तीबाबत सप्टेंबर २०१७च्या निर्णयाला अधीन राहून या प्रशिक्षणार्थीच्या निवडीबाबत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन देखील रेल मंत्र्यांनी यावेळी दिले.