गाडीला आरसा नाहीय ? मग तुम्हालाही होईल 'ही' शिक्षा

 विनाआरसा गाडी चालवणाऱ्यांना आता आरटीओची नजर

Updated: Dec 17, 2020, 11:09 AM IST
गाडीला आरसा नाहीय ? मग तुम्हालाही होईल 'ही' शिक्षा  title=

मुंबई : नव्या वर्षात टोलनाक्यापासून गाड्यांपर्यंतचे नियम बदलू लागले आहेत. टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय. दुसरीकडे विनाआरसा गाडी चालवणाऱ्यांना आता आरटीओची नजर असणारेय. वाहन चालवताना लायसन्स, कागदपत्रे, विमा पॉलिसी, पीयूसी प्रमाणपत्र, वाहनांच्या दोन्ही बाजूचे आरसे बंधनकारक आहेत. विनाआरसा वाहन चालविणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारला जाणारेय. 

तरुण मुलांमध्ये विनाआरसा गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असते. गाडीला आरसा नसल्यास चालकास मागच्या गाड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात. यावर आळा घालण्यासाठी वाहनांचा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. 

परिवहन विभागातर्फे विनावाहन परवाना, विना कागदपत्रे, विमा पॉलिसी असणाऱ्यांवरील कारवाई होणार आहे. तसेच फॅन्सी नंबर प्लेट न वापरण्याचे आवाहन देखील परिवहन विभागातर्फे वारंवार करण्यात येते. मोबाईलवर बोलत वाहन चालविण्यांनाही भुर्दंड पडतो. आता विभागाने आरसे नसणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतलीय.