मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे, कल्याण-डोंबवली आणि नवी मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील 18 नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 नगरसेवक, शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत.
मीरा भाईंदर शहरात गेल्या 13 वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात आणि पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे १८ शिवसेना नगरसेवक, तसंच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची जी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत आणि शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हॉटेल लिलामध्ये हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांना दुपारी 3 नंतर भेटणार आहेत