मुंबई : मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई मेट्रोच्या डीएन नगर येथील कार्यालयाचा पाणीपुरवठाच बंद केला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.
मुंबई मेट्रोचे डीएन नगर येथील कार्यालयाने मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर थकविला होता. मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासंदर्भात मेट्रो कार्यालयाला वारंवार नोटीस देण्यात आली. मात्र, नोटीस दिल्यानंतरही थकबाकी रक्कम भरण्यात आली नाही. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली गेली.
मुंबई मेट्रोने मुंबई महापालिकेचा सुमारे २५० कोटी रूपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे पाणीखात्याच्या कामगारांसह के/पश्चिम कार्यालयाच्या अधिकार्यांनी मुंबई मेट्रो अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये जावून ही कारवाई केली. मात्र, ही जलजोडणी तोडल्यानंतर महापालिका आणि मेट्रो अधिकार्यांची थकबाकी भरण्याबाबत चर्चा झाली.