मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखर होणार आहे. मुंबईकरांना येत्या मे महिन्यात मोठे मेट्रो (Mumbai Metro) गिफ्ट मिळणार आहे. येत्या मे महिनाअखेर मुंबईकरांसाठी मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 हे (Metro-2A and Metro-7 routes) मार्ग सुरू होणार आहेत. आज रात्री उशिरापर्यंत मेट्रोचे कोचेस मुंबईत दाखल होतील. दहिसरला मेट्रो दाखल होतील.
दहिसर-अंधेरी (मेट्रो-7) आणि दहिसर-डी एन नगर (मेट्रो 2 ए) या मार्गिकांसाठी ट्रायल रन होणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी फेब्रुवारीत ट्रायल रन सुरू होतील. एकूण 576 कोचेस टप्प्याटप्याने मुंबईत दाखल होत आहेत. या दोन्ही मार्गावरची मेट्रो ड्रायव्हरलेस असेल. मात्र सुरूवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू होईल. भारतातच मेट्रो कोचेसची बांधणी होत असल्यामुळे प्रत्येक कोचमागे दोन कोटी रूपये वाचले आहेत.
येत्या मे अखेरीस मुंबईकर प्रवाशांसाठी मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावर मेट्रो धावणार आहे. दरम्यान, ड्रायव्हरलेस मेट्रो मुंबईत धावणार आहे. सुरुवातीला चालक असेल. मात्र, आधुनिक तंत्राचा वापर करुन भविष्यात ही विनाचालक ट्रेन चालवली जाणार आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए साठीच्या ट्रायल रनसाठी आज रात्री बंगळुरुहून मेट्रो ट्रेन्स मुंबईत दाखल होणार आहेत. पहिला कोच येत्या आज मुंबईला पोहोचेल.