मुंबई महापालिकेत अग्निशमन दलात मेगाभरती, तब्बल 910 जागा भरणार

मुंबई अग्निशमन दलात नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्वाची बातमी, पाहा कधी पासून सुरुवात होणार मेगाभरती, काय असणार अटी

Updated: Dec 30, 2022, 06:49 PM IST
मुंबई महापालिकेत अग्निशमन दलात मेगाभरती,  तब्बल 910 जागा भरणार title=

BMC Fire Brigade Recruitment  : मुंबई महापालिकेत अग्निशमन दलात (Fire Brigade) आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती (Recruitment) होत आहे. मुंबई अग्निशमन दलात 910 फायरमनच्या (Fireman) जागांसाठी भरती केली जाणार आहे. 2017 मध्ये 750 पदांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर ही सर्वात मोठी भरती होणार आहे. मुंबई अग्निशमन दलात नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी शारीरिक चाचणी, मुलाखतीला 13 जानेवारी 2023 पासून सुरुवात होणार आहे.  प्रत्येक आरक्षण गटानुसार या भरतीचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत असेल.

मेगाभरतीची जाहिरात मुंबई महापालिकेच्या (BMC) वेबसाईटवर उपलब्ध आहे. एकूण 910 पदांमध्ये 434 पदं ही खुल्या प्रवर्गात असून, ही पदं सरळ सेवेने म्हणजेच वॉक इन सिलेक्शन पद्धतीने भरली जाणार आहेत. यासंदर्भात सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने प्रस्ताव पाठवलाहोता, त्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या नोकर भरतीत 30 टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

मुंबईत आगीच्या वाढत्या घटना आणि इतर आपत्कालीन समस्यांचा सामना करण्यासाठी अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे अडचणी येत होत्या. पण आता मेगाभरती होणार असल्याने या समस्या काही प्रमाणात कमी होणार आहेत. 

महिलांसाठी 270 जागा राखीव
अग्निशमन दलाच्या नोकरभरतीत महिलांसाठी तब्बल 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच 910 जागांपैकी 270 जागा महिलांसाठी असतील. सध्या मुंबई अग्निशमन दलात 108 महिला कर्मचारी कार्यरत आहेत यात 270 महिलांची भर पडणार असून एकूण संख्या 378 इतकी होणार आहे. 

वाढत्या मुंबईसाठी कर्मचारी अपूरे
मुंबईत एकूण 35 अग्निशमन केंद्र असून यात साधारण: 2800 अधिकारी आणि कर्माचारी कार्यरत आहेत. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्यादृष्टीने हा आकडा फारच कमी आहे. त्यातच टप्प्याटप्याने अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत असतात. यात अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जातात, पण कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त राहत असल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत होता. पण आता मोठ्या कर्मचारी भरतीला मंजुरी मिळाली आहे. 

पदासाठी लागणारी पात्रता

पदाचे नाव : फायरमन

पात्रता : 12वी ला 50% घेऊन प्रथम प्रयत्नात पास

वय : आरक्षित उमेदवाराकरिता 20 ते 30 वर्ष 
    सामान्य उमेदवार करीत 20 ते 27 वर्ष

पगार : Rs 21,000/- ते 70,000/-

उंची :  पुरुष : 172 cm
        महिला : 162 cm

वजन : 50 Kg (किलो)

छाती : साधारण : 81 सेमी
    फुगवून : 86 सेमी

नोकरीचं ठिकाण : मुंबई