रविवारी घराबाहेर पडताय ? हे वाचाच

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकमुळे होणाऱ्या लोकल रखडपट्टीपासून दिलासा मिळणार आहे. 

Updated: Dec 6, 2019, 08:30 PM IST
रविवारी घराबाहेर पडताय ? हे वाचाच  title=

मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवार 8 डिसेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकमुळे होणाऱ्या लोकल रखडपट्टीपासून दिलासा मिळणार आहे. 

ट्रान्स हार्बर : ठाणे ते वाशी, नेरुळ अप-डाउन दोन्ही मार्गावर, सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यत मेगा ब्लॉक असणार आहे. परिणामी ब्लॉकदरम्यान ठाणे-वाशी, नेरुळ, पनवेल लोकल पुर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे या प्रवाशांना मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरुन प्रवासास मुभा देण्यात आली आहे. 

पश्चिम रेल्वे : सांताक्रुझ ते माहिम दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दु.3.35 वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरुन होणार आहे. तर रविवारी बांद्रा-खार रोड दरम्यानचे फाटक बंद असणार आहे. यावेळी काही लोकल गाड्या रद्द करण्याची सूचना देण्यात आली आहे.