Central Railway Mega Block : रविवारी म्हणजे 8 जानेवारीला तुम्ही रेल्वेने (Railway) प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेच्या यांत्रिकी कामांसाठी रविवारी 8 जानेवारीला हार्बर (Harbour Line) आणि ट्रान्सहार्बर मार्गावर (Tran Harbour Line) मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर मात्र या रविवारी मेगा ब्लॉक नाही. (Mega block on central railway at central line latest Marathi news)
कसं असेल रविवारीचं वेळापत्रक
- ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
- ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.०४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.०७ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील असं मध्य रेल्वेच्यावतीने घोषित करण्यात आलं आहे. तसंच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ८ जानेवारीला सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल