मुंबई : रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.
कल्याण - ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ वाजल्यापासून दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.०० वाजल्यापासून दुपारी ४.२१ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या सेवा कल्याण व ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येईल आणि ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकादरम्यान आपल्या निर्धारित अप अप जलद मार्गावर चालवण्यात येईल आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकावर थांबेल व आपल्या निर्धारित स्थानकावर २० मिनटे उशीरा पोहचेल.
सकाळी १०.०८ वाजल्या पासून दुपारी ०२.४२ पर्यंत सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद मार्गांची सेवा आपल्या संबंधित निर्धारित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप तसंच मुलुंड स्थानकावर थांबेल आणि आपल्या स्थानकावर १५ मिनिटे उशिराने पोहचेल.
सीएसटी – चुनाभट्टी / बांद्रा डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० वाजल्यापासून दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / बांद्रा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
सकाळी ११.३४ पासून दुपारी ४.४७ पर्यंत सीएसटीहून वाशी / बेलापूर / पनवेल साठी सुटणाऱ्या सर्व सेवा आणि सकाळी ९.५६ पासून सायंकाळी ४.४३ पर्यंत सीएसटीहून बांद्रा / अंधेरी करीता सुटणाऱ्या सेवा रद्द करण्यात येतील.
सकाळी ९.५३ वाजल्यापासून दुपारी ३.२० पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसटीकरीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गाच्या सर्व सेवा आणि सकाळी १०.४५ वाजल्यापासून दुपारी ५.०९ पर्यंत अंधेरी / बांद्रा येथून सीएसटीकरीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गाच्या सेवा रद्द करण्यात येईल. मेगाब्लॉक दरम्यान पनवेल-कुर्ला (प्लॅटफार्म क्र.8) मार्गावर विशेष सेवा चालविण्यात येतील.
रविवारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी - दादर पॅसेंजरची यात्रा दिवा स्थानकांवर समाप्त करण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक ५०१०३ दादर - रत्नागिरी पॅसेंजरची यात्रा दिवा स्थानकांवरून प्रारंभ होईल. मेगाब्लॉक दरम्यान मुंबईला येणाऱ्या तसेच जाणाऱ्या मेल / एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित स्थानकांवर २० ते ३० मिनिटे उशिराने पोहचेल.