एसटीमध्ये मेगा भरती

खी परीक्षा २ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या पदासाठी चालक कंडक्टर संयुक्त पदासाठी ४४५ महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

Updated: Jun 15, 2017, 09:05 PM IST
एसटीमध्ये मेगा भरती title=

मुंबई : एसटी महामंडळातील चालक कंडक्टर पदासाठी मेगाभरती सुरू आहे, यातील चालक कंडक्टर पदासाठी लेखी परीक्षा २ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या पदासाठी चालक कंडक्टर संयुक्त पदासाठी ४४५ महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

एसटीच्या कोकण विभागासाठी चालक कंडक्टर श्रेणीतील ७ हजार ९२९ पदांसाठी २८ हजार ३१४ उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. यात चालक-कंडक्टर संयुक्तपदासाठी ४४५ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत.

चालक-कंडक्टर पदांच्या लेखीपरीक्षेचे प्रवेशपत्र त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी तात्पुरता पासवर्ड वापरून प्रवेश पत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राबाबतचा तपशील इमेल वा एसएमएसने कळविण्यात येईल.

जानेवारीत चालक-कंडक्टर पदांसह लिपिक, टंकलेखक, पर्यवेक्षक आदी पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील चालक-कंडक्टर पदांसाठी २ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. अन्य पदांसाठी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.