नवी मुंबई : राज्यातल्या माथाडी कामगारांनी आज एक दिवसाचा संप पुकारलाय.
वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये काल झालेल्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला. राज्यात माथाडी कामगार कायद्यात बदल करण्यात येत आहेत.
कायद्यातील बदलामुळे माथाडी कामगार देशोधडीला लागतील अशी भीती संघटनांना वाटतेय. कायद्यातील बदलांमुळे माथाडी बोर्डाचे अधिकार काढून घेण्यात येतील.
त्याऐवजी नवं मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. हे मंडळ सरकारच्या अखत्यारित असल्यानं ते मालक धार्जिणे असण्याची शक्यता आहे.
यामुळे माथाडी कामगारांचे नुकसान होईल, अशी भीती ३५ माथाडी कामगार संघटनाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. कायद्यातील बदल तात्काळ थांबवण्याच्या मागणी या संपाद्वारे करण्यात येणार