धबधब्यावरून 'बाहुबली'सारखी उडी मारली, मुंबईच्या व्यावसायिकाचा मृत्यू

धबधब्यावरून बाहुबलीतल्या प्रभाससारखी उडी मारण्याचा प्रयत्न मुंबईच्या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे.

Updated: Aug 1, 2017, 04:28 PM IST
धबधब्यावरून 'बाहुबली'सारखी उडी मारली, मुंबईच्या व्यावसायिकाचा मृत्यू  title=

मुंबई : धबधब्यावरून बाहुबलीतल्या प्रभाससारखी उडी मारण्याचा प्रयत्न मुंबईच्या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे. शहापूरजवळच्या माहुली धबधब्यावरून उडी मारताना इंद्रपाल पाटील या व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.

उंच धबधब्यावरून स्टंटबाजी करत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच इंद्रपालच्या मृत्यूनं आम्हाला धक्का बसल्याची प्रतिक्रिया इंद्रपालची पत्नी आणि त्याचा भाऊ महेंद्रनं दिली आहे.

माहुल धबधब्यावर मृत्यू झाल्याची यंदाची ही दुसरी घटना आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये या धबधब्यावर असे अपघात होत असतात गेल्या काही वर्षांमध्ये या अपघातांची संख्या वाढली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मागच्या महिन्यामध्ये जिथून धबधबा वाहायला सुरुवात होते तिकडे जायच्या प्रयत्नामध्ये एकाला हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. लवकरच या धबधब्यावर पर्यटकांना बंदी करण्याच्या प्रयत्नांमध्ये पोलीस आहेत.