Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक, कोरोना निर्बंध लागू होणार?

सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत (maharashtra state cabinet meeting) दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि नियमावली (Corona Restriction) यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय.

Updated: Jun 5, 2022, 06:13 PM IST
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक, कोरोना निर्बंध लागू होणार? title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अलर्ट झालीय. मुंबई पालिकेने टेस्टिंग वाढवण्यासह मालाडमधील कोव्हिड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारची उद्या सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोना नियमावलीबाबत चर्चा होणार आहे. (maharashtra state cabinet meeting will be held monday 6 june may discussion on corona patients and covid guidelines)

राज्यात एकाएकी झपाट्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याने एकूणच भितीचं वातावरण आहे. आतापर्यंत कोरोनामध्ये आपल्या सर्वांनाच मनाविरुद्ध या सर्व निर्बंधांचं पालण करावं लागलं. मात्र पुन्हा तशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन सतर्क झाली आहे. 

सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि नियमावली यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातोय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. 

...तर मास्कसक्ती अटळ 

मुंबईत कोरोना रुग्ण वाढल्यास मास्कसक्ती अटळ असल्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. कोरोना नियम न पाळल्यास कठोर निर्बंध लागतील, असाही इशारा अस्लम शेख यांनी दिलाय. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मास्क घालण्याचं आवाहन केलंय.