या बॅकेंच्या ATM च्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर......

बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.  

Updated: Jun 5, 2022, 05:29 PM IST
या बॅकेंच्या ATM च्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर...... title=

SBI ATM Withdrawl Rule Changed : बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचललंय. आता SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकणे अनिवार्य आहे. या नवीन नियमानुसार, ओटीपीशिवाय खातेधारकांना रक्कम काढता येणार नाही. पैसे काढण्याच्या वेळी मोबाइलवर एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी टाकल्यानंतरच एटीएममधून पैसे मिळतील. (sbi state bank of indian rules have changed for withdrawing cash from atm know details rules)

ट्विटद्वारे दिली माहिती 

बँकेने ट्विट करून याबाबची माहिती दिली आहे. एसबीआय एटीएम व्यवहारासाठी ओटीपाच्या वापरामुळे ठकांना चाप असेल, असं म्हटलंय.  ग्राहकांचं फसवणुकीपासून संरक्षण करणे ही आमचं प्रथम प्राधान्य आहे, असंही नमूद करण्यात आलंय.  

जाणून घ्या नियम

हे नियम 10 हजार  किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यावर लागू आहेत. SBI ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून रजिस्टर्ड मोबाईलवर पाठवण्यात आलेला ओटीपी आणि डेबिट कार्डसह प्रत्येक वेळी ATM मधून 10 हजार आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी आहे.