Maharashtra Rain Update : राज्यात येत्या 3-4 तासांत पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

दडी मारलेल्या पावसाबाबत मोठी (Maharashtra Rain Update) अपडेट समोर आली आहे.

Updated: Aug 30, 2022, 05:58 PM IST
Maharashtra Rain Update : राज्यात येत्या  3-4 तासांत पाऊस, हवामान खात्याचा अंदाज title=

मुंबई : राज्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारलीय. मात्र आता या दडी मारलेल्या पावसाबाबत मोठी (Maharashtra Rain Update) अपडेट समोर आली आहे. येत्या 3-4 तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. (maharashtra rain update 2022 meteorological department has warned of heavy rain in these districts of state in the next 3 4 hours)

खान्देश, (Khandesh) पश्चिम महाराष्ट्रसह (Western Maharashtra) मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वेधशाळेकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस शकतो. तसेच वातावरण ढगाळ राहिल, असंही हवामान खात्याने नमूद केलंय.