Maharashtra Weather Forecast : मुंबई-ठाण्यासह राज्यात 'या' भागात 12 सप्टेंबरपासून जोरदार पावसाचा इशारा

मुंबईसह ठाण्यात (Mumbai Thane) पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून कमालीची वाढणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून (Imd) देण्यात आला आहे.

Updated: Sep 10, 2022, 03:59 PM IST
Maharashtra Weather Forecast : मुंबई-ठाण्यासह राज्यात 'या' भागात 12 सप्टेंबरपासून जोरदार पावसाचा इशारा title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : मुंबईसह राज्यात गेल्या दिवसांपासून जोरदार पाऊस (Maharashtra Rain Update) बरसतोय. त्यात आता पुढील आणखी काही दिवस जोरदार पाऊस बरसरणार असल्याचं समोर आलं आहे. हवामान खात्याने (Imd) दिलेल्या माहितीनुसार राज्यात  4-5 दिवसांमध्ये मान्सून सक्रीय राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  (maharashtra rain alert imd predicts that intensity of rain will increase in mumbai thane konkan areas from September 12)

मुंबईसह ठाण्यात (Mumbai Thane) पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून कमालीची वाढणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच  घाट माथ्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस सक्रीय राहील असा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी याबाबतचं ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

बार्शीत दोन दिवसापासून जोरदार

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मागील 2 दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय. या धुवांधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. खामगावमध्ये पपईच्या बागांचं नुकसान झालंय. शेतात पाणी साचलंय. त्यामुळे पपईची झाडं कुजायला सुरुवात झाली आहे.  शेतकऱ्यांना  हाता-तोंडाशी आलेलं पपईचं पीक डोळ्यादेखत गमावण्याची वेळ आली. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय.

जुन्नरमध्ये मुसळधार

पुण्यातील जुन्नरमधील बेल्हे पारगावमध्ये पावसाचा कहर पहायला मिळालाय. परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला. पोल्ट्रीत पाणी शिरलं. त्यामुळे जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त कोंबड्यांचं मृत्यू झाला.